नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी अंतर्गत मे. न्यु अलकनंदा को. ऑप. हौ. सो. लि. (एम. जी. कॉम्प्लेक्स) बिल्डींग नं. सी-03, भुखंड क्र. 45/2 सेक्टर- 14 येथरे आर सी सी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घता अनधिकृतपणे तयार केलेले होते. सदर अनधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम तसेच ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. मा. आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांचे आदेशान्वये व उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचे बांधकाम हटविण्यात आले. या धडक मोहिमेसाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण 10 मजुर, 1 इलेक्ट्रिकल हॅमर यांचा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
00000
