ठाणे : जिल्हा परिषद ठाणे येथे गेली ३१ वर्ष वाहन चालक म्हणून सुशिल अंबाजी नवार यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज (दि. ०९ ऑगस्ट) जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला. दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झालेल्या वाहन चालक सुशिल नवार यांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी मार्गदर्शन करताना वाहन चालक यांची भुमिका प्रशासनात मोलाची असून सुशिल नवार यांनी ३१ वर्ष प्रदिर्घ सेवा दिल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, तसेच वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष अनिल शेलार, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, सचिव राजकुमार कुसाळकर, उपाध्यक्ष सुरेश पवार, प्रसिध्दी प्रमुख नरेंद्र भोईर, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नरेंद्र भोईर यांनी केले.
0000
