अशोक गायकवाड

 

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून टू व्हीलर, फोर व्हिलर, रिक्षा पार्किंग व कचरा आदी समस्यांच्या विळख्यात डेक्कन जिमखाना परिसर अडकला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) व डेक्कन जिमखाना रहिवाशांनी नगरपरिषद व स्थानिक पोलिसांना निवेदन दिले आहे. नगरपरिषदेने कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) कर्जत नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात्व येईल, असा इशारा कर्जत शहर अध्यक्ष ॲड.भाऊसाहेब मोरे यांनी या निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना ॲड.भाऊसाहेब मोरे यांच्यासह राजन भोळे, दिलीप आंबवणे, दिगंबर चंदने, महेंद्र चंदन- पाटील, चैतन्य देशमुख, महेश सारडा, रमाकांत ठोंबरे, सुशिल आंबवणे अनिल जाधव आदी रहिवासी उपस्थित होते.*
कर्जत शहरामध्ये नागरिकरण वाढत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. टू व्हिलर, फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा उरत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय कर्जत ते युको बँकच्या दरम्यानच्या रस्त्याला व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्थानकांपर्यंतच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रिक्षा, टू-व्हिलर, फोर व्हिलर पार्क केल्या जातात. शनिवार, रविवारी लोकांना चालण्यासाठीही जागा नसते. त्यामुळे नगरपरिषदेने संबंधिताना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावे आणि डेक्कन जिमखान्यामधील लोकांचा मार्ग मोकळा करावा. तसेच येथे इतरत्र पडलेला कचरा त्वरित उचलण्यात यावा, आदी समस्यांकडे निवेदनांतून कर्जत नगरपरिषद चे लक्ष वेधण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *