महाआयटी पोर्टलवर 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 

ठाणे : सामाजिक न्याय व विशेष विभागाच्यांतर्गत ठाणे जिल्ह्यातील मुलांची 4 व मुलींची-4 अशी एकूण-8 शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांतील रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी “महाआयटी पोर्टल” सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर रिक्त जागांवर प्रवेश मिळेल. विशेष म्हणजे या पोर्टलवर वसतिगृहासाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला असेल तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
वसतिगृहासाठी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज केला आणि वसतिगृहात नंबर नाही लागला तर पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना आपोआप वसतिगृहात प्रवेश न झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकडे विद्यार्थ्यांची नोंद होईल. त्यानंतर त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळेल.
महा आयटी पोर्टलवरील लिंकचा वापर करून अर्ज करा
नवीन पोर्टल लिंकचा वापर करून व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी नवीन पोर्टल लिंकचा वापर करून व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी प्रवेश करणे सुरू झाले आहे. नियम, अटी व शर्ती यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. वसतिगृहात प्रवेश अर्ज भरण्याकरिता व्यवसायीक अभ्यासक्रमाची पदविका प्रथम वर्षात, तसेच थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येईल.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी 30 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी या पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या; परंतु जागे अभवी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल.
अडचण आल्यास मार्गदर्शन घ्या…
शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी, तसेच स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org प्रस्तुत लिंकचा वापर करूनअर्ज भरावे, काही अडचणी उद्भवल्यास स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन ठाणे समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *