ठाणे : कोलकात्यातील महिला डॉक्टरची अत्याचारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल कोपरीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीत निषेध रॅली काढून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच या हल्ल्याचा तीव्र निषेध करून पश्चिम बंगालमध्ये महिलांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्याची मागणी केली
कोलकाता येथील हॉस्पिटलमधील घटनेचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याबद्दल कोपरीवासियांच्या भावनाही तीव्र आहेत. या पार्श्वभूमीव देशभरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांचा संप पुकारण्यात आला होता. या संपाला पाठिंबा देण्यासाठी तारामाऊली सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या वतीने कोपरीमध्ये रॅली काढण्यात आली. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रॅलीच्या सुरुवातीला उपस्थित राहून या घटनेचा निषेध केला. या रॅलीत भाजपा ठाणे शहर सरचिटणीस डॉ. समीरा भारती, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, तारामाऊली सामाजिक संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. भावना भरत चव्हाण, डॉ. सोनल भरत चव्हाण, माजी नगरसेविका रेखा पाटील, कोपरी मंडल अध्यक्ष शिवाजी रासकर, सुवर्णा अवसरे, सुचित्रा भोईर, श्रुतीका मोरेकर, निलेश कुशवाह यांच्यासह कोपरीकरांचा सहभाग होता.
कोपरी कॉलनी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, स्टेशन रोड, भाजी मार्केट, ठाणेकरवाडीहून कन्हैय्या नगरपर्यंत काढलेल्या रॅलीत शेकडो कोपरीकर सामील झाले होते. या रॅलीत दोषी आरोपींचा तीव्र धिक्कार करण्यात आला. तसेच महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायदे आणखी कठोर करण्याची मागणी करण्यात आली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *