पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून आभार

 

ठाणे : ठाणे शहरातील २५ लाखांहून अधिक नागरिकांचे वेगवान प्रवासाचे स्वप्न अंतर्गत मेट्रो प्रकल्पामुळे पूर्ण होणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही धन्यवाद दिले आहे.
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पात नवीन ठाणे, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाईनगर, निळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पातलीपाडा, आझादनगर बस स्टॉप, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आदी स्थानके असतील. या मेट्रोचा वेग ताशी ८० किलोमीटर असल्यामुळे ठाण्यातील रहिवाशांना एका भागातून दुसऱ्या टोकाला वेगाने जाता येईल. येत्या २०२९ पर्यंत मार्ग पूर्ण झाल्यानंतर या मेट्रोमुळे दर तासी १५ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीत अडकावे लागणार नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली.
ठाणे अंतर्गत मेट्रोच्या एका कार युनीटमध्ये प्रती चौरस मीटर प्रवाशांची क्षमता ६ ते ८ आहे. उन्नत व भूमिगत स्थानकांच्या मेट्रो मार्गामुळे ठाण्याच्या विकासाला आणखी वेग येईल. तसेच ठाणे शहराची देशातील विकसित शहरांमध्ये नोंद होईल, अशी आशा भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मेट्रो प्रकल्पाची किंमत १२ हजार २०० कोटी रुपये असून, पुढील पाच वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
चौकट
अशी धावणार अंतर्गत मेट्रो (भूमिगत व उन्नत मार्ग) :
नवीन ठाणे (भूमिगत), रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाईनगर, निळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ (भविष्यामध्ये प्रस्तावित), वॉटरफ्रंट, पातलीपाडा (भविष्यामध्ये प्रस्तावित),आझादनगर बस स्टॉप, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र (भविष्यामध्ये प्रस्तावित),बाळकुम नाका, बाळकुम पाडा (भविष्यामध्ये प्रस्तावित), राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *