माथेरान : सन 2023 /24 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा” हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता १/१/२४ ते १५/२/२०२४ या कालावधीत राबविण्यात आले या अभियानास  विद्यार्थी, शिक्षकांबरोबर  माजी विद्यार्थी पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास 95 टक्के विद्यार्थी शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद देखील करण्यात आली आहे. या अभियानात तालुका जिल्हा व राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आली आहेत या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली आहे.
माथेरान सारख्या दुर्गम भागातील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेने या स्पर्धेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. मराठी माध्यमाच्या या नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक वर्ग अत्यंत आत्मीयतेने विद्यार्थ्यांना घडविण्याचे प्रांजळपणे प्रयत्न करत असून शिक्षक वृंद पदवीधर असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमा बरोबरच उत्तम नागरिक होण्याचे संस्कार देखील केले जात आहेत. या शाळेत सर्वसामान्य लोकांची मुले शिक्षण घेत असून याच शाळेच्या जडणघडणी मधून अनेक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात जाण्यासाठी सोपस्कार झाले आहे. परंतु सद्यस्थितीत सुशिक्षित असो किंवा अशिक्षित पालक वर्ग यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवण्यात अधिक रस दिसत आहे. आर्थिक परिस्थिती जरी बेताची असली तरीसुद्धा इंग्रजीचे खूळ डोक्यात भिनल्याने मराठी शाळेची पटसंख्या दरवर्षी कमी होत चालली आहे. निदान मुलांवर उत्तम संस्कार घडावेत यासाठी पालकांनी मराठी शाळेला प्रथमतः प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे अभ्यासू नागरिक बोलत आहेत.
नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल या शाळेला केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्थानिकांनी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————————————-
मागील अनेक दिवसांपासून शिक्षक वर्गाने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे आणि त्यांचे सर्व सहकारी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असताना मुलांना पुस्तकी अभ्यासक्रमा बरोबर सामाजिक उपक्रमावर भर घालतात. त्या सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन.
शिवाजी शिंदे– माजी विरोधी पक्षनेते माथेरान नगरपालिका
——————————————-;;——–
मा. मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या अभियानात सहभाग घेतला. सर्व शिक्षक आणि पालक यांनी या करीता योगदान दिले. शाळा या पुढे गुणात्मक कामगिरी करून आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दिलीप अहिरे— मुख्याध्यापक
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *