मुंबई संघाला विजेतेपद
मुंबई : सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे सुरु असलेल्या ५८ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या संघाने महिला सांघिक गटाचे विजेतेपद पटकाविले. साखळी गटात मुंबईने आपले सर्व सामने जिंकून ८ गुणांची कमाई करत या गटाचे विजेतेपद पटकाविले. तर ठाण्याचा संघ व पुण्याच्या संघात प्रत्येकी ४ गुण झाल्याने बरोबरी झाली. परंतु गुणकोष्टकाच्या आधारे ठाण्याच्या संघाला उपविजेतेपद तर पुण्याच्या संघ तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे घोषित करण्यात आले. मुंबई संघातर्फे काजल कुमारी व अंबिका हरिथ हिने एकेरीचे सामने जिंकले. तर ऐशा साजिद खान व मिताली पाठक जोडीने आपले दुहेरीचे सामने जिंकले.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल
अनिल मुंढे ( पुणे ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१९, २३-१०
फहीम काझी ( मुंबई ) वि वि योगेश परदेशी ( पुणे ) १९-२१, २५-१४, २५-१०
रिझवान शेख ( मुंबई उपनगर ) वि वि झैद फारुकी ( ठाणे ) २५-०, २५-१०
योगेश धोंगडे ( मुंबई ) वि वि विकास धारिया ( मुंबई ) २५-१०, १४-१०
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल
काजल कुमारी ( मुंबई ) वि वि अंजली सिरीपुरम ( मुंबई ) २२-२१, २४-१८
दीक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुबई उपनगर ) २५-४, १२-११
मधुरा देवळे ( ठाणे ) वि वि पुष्कर्णी भट्टड ( ठाणे ) २४-१०, २२-८
समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) ११-२०, २३-१०, २०-९
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *