दक्षता पथक मार्फत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नेरुळ विभागाअंतर्गत नेरुळ स्टेशन व सेक्टर-20 येथील गुडविल कॉर्नर येथे पदपथावर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या तसेच बेवारसपणे वाहन पार्किंग करणारे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पंधरा हातगाडी, तीन टेम्पो व एक रिक्षा इत्यादींवर सदर मोहिमेअंतर्गत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील केंद्रीय अतिक्रमण् दक्षता पथक मार्फत पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर हटविण्याची व सामान जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले सामान कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आलेले आहे. सदर कारवाईसाठी अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, तेरा मजूर, तीन टोईंग, तीन पिकअप, एक आयशेर, अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक उपस्थित होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.