अनिल ठाणेकर
आज भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे शहर तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे महाविकास आघाडीचे घाणेरडे राजकारण सुरू आहे त्याविरोधात निषेध आंदोलन ठाण्याच्या तलावपाली ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुलेजी यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा जिल्हाऋध्यक्ष सूरज दळवी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी ठाणे शहर आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेविका प्रतिभा मढवी, भाजप जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मढवी, चिटणीस श्रुतिका कोंगणोळीकर, नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृशाली वाघुले, सुषमा ठाकूर, शिंदेताई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
00000