खेळाडूंना पुनीत बालन यांच्याकडून लाखो रुपयाचे सहाय्य जाहीर

 

पुणे : स्व. विनायक निम्हण यांनी सुरु ठेवलेला आदर्श व सामाजिक कार्याचा वसा कायम सुरु ठेऊ असे आश्वासीत करत खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन सोमेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचविणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकरंच्यावतीने जाहीर नागरी सत्कार करातना सनी निम्हण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित गौरव समारंभात या सोहळ्याच्या अधक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती व खेळाडूंचे पाठीराखे पुनित बालन होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सोमेश्वर फाऊंडेशनचे सनी निम्हण, क्रीडा जागृतीचे प्रताप जाधव यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. केंद्र शासनाने सन २०१४ पासून क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक धोरण स्वीकारले असून त्याद्वारे अनेक चांगले बदल झाले आहेत त्यास अनुसरून राज्य शासनही प्रयत्न करीत असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सत्कारमूर्ति खेळाडूंमध्ये पॅरिस ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे, सहभागी झालेले सातारा जिल्ह्यातील फलटण सारख्या ग्रामीन भागातील तिरंदाज प्रविण जाधव आणि ॲथलेट नाशिक जिल्हामधील देवगावचा सर्वेश कुशारे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात कमी वयात सुवर्णपदकाला गवसनी घालणारी भारताची पहिली महिला तिरंदाज तसेच अर्जुन पुरस्कार सन्मानीत सातारची आदिती स्वामी आणि सुवर्णपदक विजेता अर्जुन पुरस्कार सन्मानीत आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे, विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत एक सुवर्ण आणि ३ रौप्यपदके पटकावणारा पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाचा खेळाडू शुभंकर खवले यांचा समावेश होता. नेमबाजीच्या प्रशिक्षिका व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती दिपाली देशपांडे, तिरंदाजी प्रशिक्षक सातारचे प्रविण सावंत, मल्लखांब प्रशिक्षक अभिजीत भोसले यांचा याप्रसंगी गौरवचिन्ह व रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
चौकट – बालन यांच्यातर्फे खेळाडूंना आर्थिक पाठबळ
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थावरुन बोलतान प्रसिद्ध उद्योगपती पुनित बालन म्हणाले की आपल्याला मिळालेल्या एक रुपयातील ३० पैसे समाजाचे ऋण फेडण्यासाठी खर्च करावेत ही शिकवन मला माझ्या आईने दिली होती. हे तत्व डोळ्यासमोर ठेवीतच मी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आणि संस्थांना मदत करीत असतो. खेळाडूंच्या विकासासाठी खेळाडू, पालक प्रशिक्षक संघटक व प्रायोजक यांनी एकत्रितपणे काम केले तर निश्चितच आपले खेळाडू ऑलिंपिक मध्ये नेत्रदीपक कामगिरी असा विश्वास बालन यांनी व्यक्त केला. या वेळी पुनित बालन यांनी स्वप्निल कुसळे यास ११ लाख रुपयांचे सहाय्य तर आदिती स्वामी, सर्वेश कुशारे, ओजस देवतळे, प्रवीण जाधव व शुभंकर खवले यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ देत अशल्याचे जाहीर केले.
मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये ४० दशाकहुन जास्त कार्यरत असलेले विनायक दळवी, सुहास जोशी, शरद कद्रेकर यांच्याबरोबर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, मिलिंद ढमढेरे, शिवाजी गोरे, कीर्ती पाटील, संजय दुधाने यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
देशाने गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. त्यामुळेच आपले खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा यामध्ये चांगले यश मिळवित असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले की स्वप्निल कुसाळे या नेमबाजाने ऐतिहासिक ऑलिंपिक पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.
या पदक विजेत्यांचा सत्कार एकाद्या संस्थेकडून न करता पुणेकारांच्यावतीने नागरी सत्कार करण्याची कल्पना सनी निम्हण यांची असल्याचे क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले. खेळाडूंना योग्य वेळी आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज विशद करुन त्यासाठी सोमेश्वर फऊंडेशनच्यावतीने टोकन स्वरुपात रोख रक्कम देण्यात आल्याचे जाधव म्हणाले.
अभ्यासाबरोबर खेळाकडेही एकाग्रतेने लक्ष द्यावे- स्वप्निल
लहानपणापासूनच मला माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी अभ्यासाबरोबरच खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच कोणतेही यश मिळवण्यासाठी संघर्षाबरोबरच काही कालावधी जावा लागतो. मी देखील बारा वर्षे अतिशय चिकाटीने सराव केला.त्यामुळेच मी ऑलिंपिक पदकापर्यंत पोहोचू शकलो असे स्वप्निल कुसाळे याने याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण पदक जिंकल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी पहिला फोन सनी निम्हणसरांचा एबीपी माझाचे वार्तांकन करणारे संदीप चव्हाण यांच्याकडे आल्याची आठवण स्वप्निल याने याप्रसंगी आवर्जुन सांगितली.
या समारंभात स्वप्निलच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे, तसेच प्रताप जाधव, सनी निम्हण, संदीप चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या समारंभास विशेष अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, ज्येष्ठ ऑलिंपिकपटू बाळकृष्ण अकोटकर, ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत स्मिता यादव – शिरोळे, अर्जुन पुरस्कार सन्मानीत शकुंतला खटावकर, शांताराम जाधव, श्रीरंग इनामदार, ऑलिंम्पियन मनोज पिंगळे, प्रशिक्षक विजय जाधव, व्हॉलीबॉलचेआंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देविदास जाधव, सातारचे जेष्ठ कबड्डीपड्डू विजय जाधव, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रंजीत चामले, खोखोपटू बिपिन पाटील, अभिजीत मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे शहरप्रमुख ॲड. अरविंद तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *