ठाणे : संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे.त्यामळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकर घेत राहील असेआश्वासन विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी दिले. संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोहळा क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉ योगेश पाटील बोलत होते.
राष्ट्रीय अध्यक्ष ऍड मनोज पाटील यांचा ३ सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडतर्फे कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला होता. त्याचे औचित्य धरून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील अकरा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यात ठाणे वैभवचे उपसंपाद्क आणि ठाणे श्र पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सामनाचे राजेश पोवळे, पुढारीचे दिलीप शिंदे,,मुंबई चौफ़ेरचे संजय भालेराव, इ टीव्हीचे मनोज देवकर, एबीपी माझाचे अक्षय भाटकर, टीव्ही नाईनचे गणेश थोरात, पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल, स्थानिक एस नाईन वृत्तवाहिनीच्या अनघा सुर्वे, सारिका साळुंखे, चौफेर दृष्टीचे अमर राजभर याना यावेळी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिलाध्यक्षा आणि शकीला शेख याचू मुंब्रा विभाग महिला आघाडीच्या कार्यध्यक्षपदी नियुक्ती कऱण्यात आली. मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांचे समयोचित भाषण झाले. सर्वश्री संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉ योगेश पाटील आणि अमित केरकर, ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षा चारुशीला पाटील; विभागीय उपाध्यक्ष जुनैद अन्सारी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी, ठाणे महिलाध्यक्षा आरती रामटेके व्यासपीठावर उपस्थित होते.
0000
