मुंबई : श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५ च्या जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यजमान श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंनी शानदार यश संपादन केले. त्यांच्या पेहेलवानांनी एकूण २७ पदके मिळवली. त्यामध्ये १५ सुवर्ण, ८ रौप्य, ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक विजेत्या कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील, वैभव माने, कोमल देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळवलेले १५ पेहेलवान विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या क्रीडा अधिकारी श्रीमती दिपाली जोशी, मिरा भाईंदर क्रीडा विभाग समन्वयक जेरविन अल्मेडिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बलराज बागल यांनी केले
स्पर्धेतील पदक विजेते
सुवर्ण
प्रतिक रामचंद्र बोबडे, शिवांश अमित जालुई, दक्ष लखाराम चौधरी, प्रिया ब्रिजेश गुप्ता, तनुजा विनोद मांढरे, लकी गणेश अडबल्ले, ओम सुनिल जाधव, कविता विनोद राजभर, स्नेहा कन्हैया गुप्ता, सुप्रिया ब्रिजेश गुप्ता, मनस्वी दिलीप राऊत, आदर्श विष्णू शिंदे, कोमल पप्पू पटे, डॉली ब्रिजेश गुप्ता
रौप्य
साईनाथ तिरुपती गायकवाड, शिवम नंदकुमार गिरी, युवराज वेनीलाल माली, पृथ्वीराज रामचंद्र बोबडे, अमर बाळू खंडारे, विकी नंदकुमार बॉइनवाड, साई कृष्णा गवळी
कांस्य
आदर्श वसंत काटकर, महावीर रमधनी गुप्ता, बालाजी नारायण पवार, महेश उमाकांत ढगे
00000
