मुंबई :कॅन्सरशी लढा देणाऱ्यांसाठी क्रांतिकारी उपक्रम म्हणून, नवी मुंबईतील खारघर येथे मेडिकोव्हर हॉस्पिटल्सने केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी सुरक्षित सुविधा देण्यासाठी डिझाइन केलेला एक केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे. एकाच वेळी १५ केमोथेरपी उपचार अत्याधुनिक उपकरणांनी घेण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णांना केमोथेरपी उपचार घेण्यासाठी आणि त्याच दिवशी घरी परतण्यासाठी केमो डे वॉर्डची स्थापना करून हॉस्पिटल ने एक अभिनव उपाय आणला आहे असे मंगेश चिवटे यावेळी म्हणाले.
कर्करोग केमो उपचारादरम्यान जास्त केस गळती होत असते. ते टाळण्यासाठी रुग्णांना ” केमो टोपी ” घालून उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ डोनाल्ड जॉन यांनी यावेळी दिली. उपचार करत रुग्णांना आनंद देण्यासाठी केमो टोपी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असे हॉस्पिटल केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता म्हणाले.
