ना शाडू ना माती ना प्लॅस्टर ऑफ पॅरिस : हा आहे पर्यावरण पूरक त्रिधातूंचा गणपती ! गेल्या अनेक वर्षांपासून योगेश वसंत त्रिवेदी, गिरीश वसंत त्रिवेदी आणि जयेश वसंत त्रिवेदी या त्रिवेदी बंधूंच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक गणेशाची पूजा बांधण्यात येते. यथासांग पूजा विधी आरत्या अथर्वशीर्ष गणेशस्तुती आदी षोडशोपचार पूजेनंतर श्री गणेशाचे औपचारिक पद्धतीने एका मोठ्या पातेल्यात किंवा भांड्यात विसर्जन करण्यात येते. ही श्री ंची मूर्ती पुनश्च व्यवस्थित ठेवण्यात येऊन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पूजेसाठी घेण्यात येते. यंदा या पर्यावरणपूरक श्रींची प्रतिष्ठापना अंबरनाथ येथे ज्येष्ठ पत्रकार, आहुतिचे संपादक श्री. गिरीश वसंत त्रिवेदी यांच्या निवासस्थानी करण्यात आली आहे.
0000
