ठाणे : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक, पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळाला नसल्यास “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनाने यापूर्वी असलेली २० ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यात आली असून नवीन मुदतवाढ ही उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे.
