आजपासून जेल भरो आंदोलना इशारा !
अनिल ठाणेकर

मुंबई : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आझाद मैदानावर, जोरदार पावसाला न जुमानता सोमवारपासून अंगणवाडी कर्मचारी व संघटक हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. २४ तासांच्या साखळी उपोषणात सुमारे ५० कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे एक हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याशी झालेल्या
भेटीनंतर शिष्टमंडळ मैदानावर परतल्यावर त्यांनी या भेटीबद्दल असमाधान व्यक्त करुन बेमुदत उपोषण, मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निघेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच २५ सप्टेंबरच्या जेल भरो आंदोलनात राज्यभरातून हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्या बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले. शासनाने अनेक घटकांना मानधनात वाढ देण्याची घोषणा केली आहे. मग शासनाच्या सर्व योजना यशस्वी होण्यासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडला आहे. शासनाने जीआर काढेपर्यंत हे आंदोलन व उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे, असे मत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *