मुंबई  :  आम्हीच शक्तिमान आणि आमचं सरकार गतिमान‘ या भ्रमातून महायुती सरकारने आता बाहेर पडावं. असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला दिला आहे.

आपल्या ट्विट मधून वडेट्टचीवार म्हणतात की, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवणे तर महायुती सरकारला जमलेच, वरून जी गुंतवणूक, उद्योग आधीपासून होते ते सुद्धा यांना टिकवून ठेवता आले नाही.पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहत हे वाहन निर्मिती उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु येथील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे येथील उद्योगांना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित व्हावे लागत आहे.

महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे मेक ईन महाराष्ट्र ऐवजी क्वाईट महाराष्ट्र सुरू झाले. असे स्पष्ट करून वडेट्टीवार म्हणतात की भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः मान्य करतात की महाराष्ट्र गुंतवणूक येत नाही, महाराष्ट्रातील नागपूर सारखे शहर स्मार्ट होवू शकत नाही.पक्षातील मंत्री, उद्योग समूह, संघटना, जनता सर्व मिळून महायुती सरकारचे लक्ष या स्थितीकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे मुजोर सत्ताधारी काही एकायला तयार नाही. इंजिन एक असो की ट्रीपल महायुती सरकारने भ्रमातून आता बाहेर यावे. अशी घणाघाती टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *