मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मरीन खात्यातील फर्स्ट क्लास मास्टर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष अहमद के. काझी ३१ ऑक्टोबरला मुंबई पोर्ट मधील ३६  वर्षाच्या निष्कलंक व  प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मरीन खात्यातील  शोअर व फ्लोटीला कामगारांच्या वतीने ३०  ऑक्टोबर २०२४ रोजी इंदिरा गोदीत जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक ॲड. जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते  ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते  युनियनच्या वतीने शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व समई भेटवस्तू देऊन युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अहमद काझी यांचा सत्कार करण्यात आला. सेवा कालावधीमध्ये अहमद काझी यांनी मरीन खात्यातील कामगारांची व  इतर गोदी कामगारांची निरपेक्षपणे सेवा केली व युनियनमार्फत कामगारांना न्याय मिळवून दिला. एक प्रामाणिक व  निष्ठावंत कार्यकर्ता, स्पष्टवक्ता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे आणि प्रत्येक लढ्यात अग्रेसर असणारे अहमद काझी हे एक आदर्श कार्यकर्ते आहेत. अशा प्रकारची शुभेच्छापर भाषणे युनियनचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस के शेट्ये, जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे.  सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे,  मनीष पाटील, उपाध्यक्ष शीला भगत,रमेश कुऱ्हाडे, संघटक चिटणीस मिर निसार युनूस, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, शोअर अँड फ्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी चौधरी, इरफान घलटे, मोतीराम कोळी, शरद पेवेकर,  अशोक  माळवी आदी मान्यवरांनी केली. याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी विष्णू पोळ संदीप चेरफळे, आप्पा भोसले, मोरेश्वर कडू आबा कोयंडे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे संघटक चिटणीस संतोष कदम यांनी केले. सत्कार सोहळ्यास  अहमद काझी यांचे वडील, कुटुंब, नातेवाईक, इतर संघटनांचे कार्यकर्ते व गोदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *