राजेंद्र साळसकर
मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.
सिद्धार्थ कांबळे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेत कार्यरत आहेत. त्यासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य आहे. अनेक सहकारी संस्थांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांचे कार्य पाहता त्यांची कार्याध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, आमदार शिवाजी गर्जे, प्रवक्ते संजय तटकरे मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, संतोष धुवाळी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने सिद्धार्थ कांबळे यांच्यावर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
0000