306 तक्रारींचे निराकरण शंभर मिनिटांच्या आत
ठाणे : निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता किँवा आचारसंहिता भंगाविषयी काही बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मातून संदेश, फोटो, व्हिडिओ व्दारे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत तक्रारीचे निवारण केले जाते.
या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात दि.31 ऑक्टोबर 2024 दुपारी 3:30 वाजेपर्यंत 348 तक्रारी प्राप्त झाल्या. या 348 तक्रारींमध्ये एकूण 324 तक्रारी दखलपात्र असून उर्वरित 24 तक्रारी अदखलपात्र आहेत. या 324 दखलपात्र तक्रारींमधून 306 तक्रारींचे 100 मिनिटाच्या आत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचेही निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सी-व्हिजिल कक्षाचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी श्री.विजयसिंह देशमुख व सहाय्यक समन्वय अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे यांनी दिली आहे.
00000