माथेरान : माथेरान येथे ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी असल्याने अंतर्गत वाहतुकीसाठी हातरिक्षाचा वापर केला जातो ही एक अमानवीय प्रथा असून दुर्दैवाने आजही माथेरानला सुरू आहे. परशुराम उर्फ कालुराम पिरकट वय 45 या आदिवासी हातरिक्षा चालकाचा रिक्षा ओढताना हॉटेल शालिमार जवळ दुर्दैवी मृत्यू झाला . मोरबे डॅम चौक जवळील निंबरवाडी येथील आदिवासी वाड्यात परशुराम राहतो गेल्या 15 वर्षापासून माथेरान येथे हातरिक्षा ओढण्याचे काम करून उपजीविका सुरू होती. हातरिक्षा ओढताना हृदयावर प्रचंड ताण पडतो.अशाचप्रकारे मागील काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मजूर इथे हा व्यवसाय करण्यासाठी यायचे त्यातील अनेक जणांचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला आहे. तर काहींना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. कुटुंबाच्या पालनपोषण करण्यासाठी नाईलाजाने ही अतिकष्टादायी कामे करावी लागत आहेत. त्यामुळेच या अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी ई रिक्षाची मागणी श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे केली आहे आतापर्यंत 20 हातरिक्षा मालकांना ई रिक्षाची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरीत 74 हातरिक्षा चालक अद्याप ई रिक्षाच्या प्रतीक्षेत आहेत.सध्याचा ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट55 पूर्ण होत आला असून उर्वरित ई रिक्षाना परवानगी देताना पायलट प्रोजेक्ट करू नये थेट कायमस्वरूपी परवानगी द्यावी.सर्वांना ई रिक्षांची आवश्यकता असून गावातील सगळेचजण या सेवेचा लाभ मोठया आनंदाने घेत आहेत.तरी लवकरच उर्वरित ७४ ई रिक्षांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेचे कार्यतत्पर उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी केली आहे.
00000