Month: October 2024

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राज्यपालांकडून अभिवादन

अशोक गायकवाड मुंबई : देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त वमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दोघांच्याही प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या दक्षता जागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.

 धाराशिवचा दुहेरी मुकुटासह दिवाळी धमाका

 सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिवचे कुमारगटात पहिले तर मुलींच्या गटात चौकारासह आठवे विजेतेपद   धाराशिव : यजमान धाराशिवने सुवर्ण महोत्सवी (५०वी) कुमार व मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत कुमार व मुली या दोन्ही गटातून  विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादिला. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेले सावित्री पुरस्कार तन्वी भोसले हिने व विवेकानंद पुरस्कार सोत्या वळवी या धाराशिवच्याच खेळाडूंनी पटकाविले. मुलींच्या गटात सोलापूर, ठाणे तर मुलांच्या गटात सोलापूर व पुण्याने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थान संपादिले. धाराशिवने कुमारगटात पहिलेच विजेतेपद पटकावले असून मुलींच्या गटात विजेतेपदाच्या चौकारासह (२०२१-२२ पासून सलग चौथे विजेतेपद) तर एकूण आठवे विजेतेपद मिळवत सुवर्णमहोत्सवी वर्षात दुहेरी विजेतेपदासह दिवाळी धमाका साजरा केला. यापूर्वी २०१५-१६ साली जळगाव येथे झालेल्या ४३ व्या स्पर्धेत ठाण्याने दुहेरी मुकुट मिळवला होता त्यानंतर तब्बल सहा अजिंक्यपद स्पर्धांनंतर धाराशिवला हा इतिहास घडवता आला. यजमान म्हणून सुध्दा दुहेरी मुकुट मिळवणारा धाराशिव हा पहिला संघ ठरला व प्रेक्षकांनी दिवाळीत विजयोत्सव साजरा करताना आकाश आतीशबाजीच्या विविध रंगांनी भरून टाकले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने सांगलीचा ११-९ असा २ गुणांनी पराभव केला. मध्यंतराची ६-४ ही २ गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. धाराशिवकडून अश्विनी शिंदेने ४.०० व २.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात ६ गुण मिळवत प्रेक्षकांना दिवाळीत फटके फोडण्याचा आनंद द्विगुणीत करून दिला. तन्वी भोसलेने १.२० आणि २.१० मिनिटे संरक्षण केले. सृष्टी सुतारने १.१० आणि १.०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गुण वासूल केला. प्रांजली काळेने पहिल्या डावात नाबाद १.२० व दुसऱ्या डावात १.३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गुण संघाला मिळवून दिला. मैथिली पवारने  १.१० व १.४० मिनिटे संरक्षण केले. सुहानी धोत्रेने आक्रमणात ३ खेळाडू बाद करताना विजेतेपदाचा धमाका उडवून दिला. तर पराभूत सांगली कडून सानिका चाफेने अष्टपैलू कामगिरी करताना ३.१०  व १.४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गुण मिळवत “हम भी किसीसे कम नही” या अविर्भावात कामगिरी नोंदवली. सानिया सुतारने १.४० व १.३० मिनिटे संरक्षण केले. प्रतीक्षा बिराजदारने आक्रमणात ३ खेळाडू बाद करून संरक्षणामध्ये १.१० व २.४० मिनिटे अशी वेळ नोंदवताना कडवी लढत दिली. पण शेवटी धाराशिवने विजेतेपदाचा विजयी चौकार मारलाच. मुलांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जादा डावांमध्ये धाराशिवने सांगलीवर  २३-२२ असा २.३० मिनिटे राखून १ गुणाने विजय साजरा करताना पहिले वाहिले विजेतेपद खेचून आणले. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात मध्यंतराला १०-७ अशी तीन गुणांची आघाडी धाराशिवकडे होती. त्यानंतर मात्र, सांगली संघाने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत आक्रमण केले व धाराशिवला १६-१६ असे बरोबरीत रोखले. जादा डावात मात्र धाराशिवने २.३० मिनिटे राखून ७-६ अशी बाजी मारली. नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करणाऱ्या धाराशिवच्या सोत्या वळवीने १.५०, २.४० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. विलास वळवीने १.२० आणि १.५० मिनिटे असे संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद केले. हरदया वसावेने दोन मिनिट व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. जितेंद्र वसावेने १.४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात चार गडी बाद केले. नितेश वसावेने १.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात पाच गडी टिपले व जमलेल्या प्रेक्षकांनी मैदानातच फटाक्यांची आतिषबाजी केली. सांगलीकडून प्रज्वल बनसोडेने १.१० व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात सहा गडी बाद केले. अथर्व पाटीलने १.३०, १.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात ४ गडी बाद केले. आदर्श खतावेने आक्रमणात पाच गडी टिपत जोरदार लढत दिली पण दिवाळीने विजयाचे दान धाराशिवच्या पारड्यात टाकले. सर्वोत्कृष्ट खेळाडू अष्टपैलू: सोत्या वळवी, तन्वी भोसले (धाराशिव). संरक्षक :  विलास वळवी (धाराशीव), सानिका चाफे (सांगली). आक्रमक : अश्विनी शिंदे (धाराशिव),प्रज्वल बनसोडे (सांगली). या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, सोलापूरचे पोलिस उपअधिक्षक दूलबा ढाकणे  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नेत्र रोग तज्ञ डॉ. वृषाली लामतुरे (वारद), डॉ. मिलिंद पोळ, डायट कॉलेजचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ सारिका काळे, मराठी चित्रपटसृष्टीचे सह दिग्दर्शक संतोष साखरे,…

निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयात दाखले सादर करावेत – देवीदास टोंगे

अशोक गायकवाड रायगड : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतनधारकांना रायगड जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी १ ते ३० नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबतचे हयात प्रमाणपत्र” या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग देवीदास टोंगे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वतः हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. पुनर्नियुक्त/पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन/निवृत्तीवेतनधारकांकरिता नियमित नमुना वापरावा. मनिऑर्डरद्वारे निवृतीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने या कोषागार कार्यालयाकडून संबंधितांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांनी स्वतःचे हयात दाखले स्वाक्षरीसह पूर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी देवीदास टोंगे यांनी केले आहे. 00000

महायुतीत भाजपच्या कमळावर आरपीआय आठवलेंचा उमेदवार;

आठवले गटात मोठी अस्वस्थता स्वाती घोसाळकर मुंबई : भाजपाने आठवले गटाला तिकीट जरी दिले असले तरी पक्षाचे अस्तित्व मान्य न करता भाजपाच्या कमळावर निवडणूक लढविण्यास सांगितल्यामुळे आरपीआय आठवले गटात अस्वस्थता आहे. त्यात…

ऐन निवडणुकीच्या काळात 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : ऐन निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस दलातील २४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे  कायदा…

महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका!

मोदींच्या ८ तर अमित शाहांच्या २० सभा मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी आता प्रचारसभांचा धडाका उडणार आहे. स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ तर गृहमंत्री अमित शाहांच्या २० सभा होणार आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित…

“एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही- मनोज जरांगे

जालना – महाराष्ट्रात एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे उद्या दलित, मुस्लीम आणि मराठा समीकरणाबाबत बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीनंतर कोणते मतदारसंघ लढायचे, कोणते उमेदवार द्यायचे, काय समीकरण जुळवायचं ते चर्चेत ठरेल. आज कुणाला पाठिंबा नाही, कुणाला उमेदवार…

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी आणंद या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील झव्हेरिभाई यांनी…

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे पोलादी व्यक्तीमत्व

गुजरात मधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ ला सरदार वल्लभभाई पटेल नावाचा लोहपुरुष जन्माला आला आणि भारतीय राजकारणात एक पोलादी व्यक्तीमत्व उदयास आले. कारण त्यांनी देशांच्या स्वतंत्र लढ्यासाठी व स्वातंत्र्य…