25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये
मुंबई : मा. न्यायालयाने दि. 9 ऑक्टोबर रोजीच्या जनहित याचिका क्र. 155/20211 बाबत दिलेल्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स / होर्डींग्ज हटविण्याची विशेष मोहीम 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. ही मोहीम सर्वच आठही विभागांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून यामध्ये परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स / होर्डिंग्ज हटविण्यात येणार आहेत.
या मोहीमेंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स / होर्डिंग्ज हटविण्यात येणार असून निष्कासन खर्चासाठी आलेली दंडात्मक रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 अन्वये अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी विनापरवागी अनधिकृतरित्या होर्डींग / बॅनर लावणे हे शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोहचविणारे असून या मोहीमेनंतरच्या कालावधीत विनापरवानगी होर्डींग / बॅनर लावण्यात येऊ नयेत असे सूचित करण्यात येत आहे. अन्यथा सदर अधिनियमाव्दारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी.
याविषयी कोणत्याही नागरिकास सूचना / तक्रार करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरील ग्रिव्हेन्स रिड्रेसल पोर्टलवर अथवा My NMMC या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ॲपवर अथवा 8422955912 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर नागरिक आपली तक्रार / सूचना नोंदवू शकतात.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या शहराचा स्वच्छ व सुंदर शहर हा नावलौकिक टिकविण्यासाठी व वृध्दींगत करण्यासाठी शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.