२० नोव्हेंबरला २०२४ ला मतदारांनी आपला हक्क बजावला व यामध्ये नेहमी पेक्षा जास्त मतदान झाले.यामुळे लोकोत्सवाला आगळेवेगळे महत्त्व आल्याचे दिसून आले व लोकोत्सव थाटात संपन्न झाला.कारण जास्त मतदान झाल्याचा फटका मतदार कोणाला देतील हे आपल्याला निकालानंतर कळेलच.परंतु यामध्ये राजकीय पुढाऱ्यांची व पक्षांची धाकधूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. कारण एक्झिट पोलचे बहुमताचे पारडे महायुतीकडे दाखवित आहे.परंतु माझ्यामते महाविकास आघाडी व व महायुती यांच्यात सर्वत्र काट्याची टक्कर असल्याने स्पष्ट बहुमत दोन्ही युतीला मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.त्यामुळे युती व आघाडी आट्यापाट्या वर रहाण्याची दाट शक्यता आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी फक्त १५० चा आकडा गाठु शकते यापेक्षा जास्त नाही यालाही नाकारता येत नाही. कारण या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष व महाविकास आघाडीचे घटकपक्ष आणि आजी-माजी आमदार- खासदार- मंत्री हे सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात होते.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विजयी होणारा उमेदवार किंवा पराजय होणारा उमेदवार यामध्ये ५००-१००० ते ५००० पर्यंत फरक दिसून येईल.त्यामुळे या निवडणुकीच्या महासग्रामात महाविकास आघाडी सुध्दा बाजी मारू शकते यालाही नाकारता येत नाही.परंतु सत्तेसाठी जर दोन्ही युतींना बहुमत मिळाले नाही तर मोठ्या प्रमाणात आपल्याला घोडेबाजार होतांना दिसेल.कारण राजकीय पुढारी सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जायला मागेपुढे पाहत नाहीत.पक्ष, स्वाभिमान, नितीमत्ता, सामंजस्य, लोकांच्या भावना, मतदारांना दिलेले वचन, पक्षासाठी घेतलेली शपथ ह्या संपूर्ण बाबींना तिलांजली देऊन घोडेबाजारामार्फत सत्तेच्या आहारी जातात.सर्वच राजकीय पक्ष म्हणतात की आमचीच सत्ता येईल.मतदार कोणाच्या बाजूने उभे आहेत हे आपल्याला निकालानंतरच कळेल.परंतु महायुतीची सरकार येवो अथवा महाविकास आघाडीची सरकार येवो सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार आपल्याला दिसून येईल यात दुमत नाही.राज्यातील अनेक भागांत काट्याची टक्कर असल्याने सट्टा बाजार सुध्दा असमंजस्यमध्ये असल्याचे दिसून येते.कारण राज्यात अशा अनेक हॉटसिट आहेत की त्यांचा अनुमान लावने बुकींना सुध्दा विचलीत केले आहे. या निवडणुकीत युती व आघाडी या दोन्ही सत्तेच्या जवळपास आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी धाकधूक निर्माण झाली आहे व अनेक दिग्गज नेत्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येते.परंतु सत्तेसाठी घोडेबाजार अटल असल्याने करोडो रुपयांचे आमीश, मंत्रीपद व इतर अटींचा खेळ अवश्य खेळल्या जाईल व ह्या गोष्टी आपल्याला अवश्य दिसेल. त्याप्रमाणे सत्ता स्थापनेचा हुकमाचा एक्का अपक्षांच्या हातात राहु शकतो.त्यामुळे युतीचे नेते व आघाडीचे नेते अपक्षांना आपल्या बाजूने करण्यासाठी घोडेबाजार करून एडीचोटी प्रयत्न करीत आहे.मतदारांच्या लोकोत्सवाला राजकीय पुढारी सत्तेसाठी घोडेबाजार करून कलंकित करण्याची चिन्हे दोन्ही बाजूंनी स्पष्ट दिसत आहेत.हीबाब लोकशाहीसाठी चिंतेचा विषय आहे.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.