8 वी एन. टी. केळकर 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
अथर्व गावडेच्या 104 धावा तर अद्विक मंडलिकने केले 7 गडी बाद
ठाणे, दि. 25 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 48 वी एन. टी. केळकर (16 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी या स्पर्धेतील पहिला सामना श्री माँ विद्यालय विरुद्ध ए. के. जोशी (45 षटके) या दोन संघांत झाला. श्री माँ विद्यालयाने हा सामना तब्बल 281 धावांनी जिंकला.
श्री माँ विद्यालयाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्री माँ विद्यालयाच्या अथर्व गावडे याने 104 धावा तर रुजुल राजणे 55 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या धावांच्या जोरावर श्री माँ विद्यालयाने एकूण 331 धावा केल्या. ए. के. जोशी विद्यालयाच्या दीप पाटील याने 8 षटकांमध्ये 40 धावांच्या बदल्यात 3 गडी बाद केले.
त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या ए. के. जोशी विद्यालयाच्या संघाने 22.2 षटकांत सर्व गडी बाद अवघ्या 49 धावा केल्या. यात अविनाश पोटे याचा 26 धावांचा वाटा होता. श्री माँ विद्यालयाच्या अद्विक मंडलिक याने (6.2-2-12-7) 7 गडी बाद केले. अशाप्रकारे श्री माँ विद्यालयाने तब्बल 281 धावांनी विजय मिळवला.
००००