मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बिमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उद्या पासुन २८, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी बिमानगर एज्युकेशन सोसायटी शाळा, एलआयसी कॉलनी, शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४००१०३ येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, नागपूर या ८ विभागातील १९२ खेळाडू, १६ मार्गदर्शक, व्यवस्थापक, ३० पंच व अधिकारी, २५ स्वयंसेवक असा एकूण २६३ जणांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धेची पूर्व तयारी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर आणि मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रथमच मुंबई उपनगर जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातून या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे कौशल्य, कसब पाहण्याची संधी मुंबईतील क्रीडा प्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांनी केले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *