अनिल ठाणेकर
बाळासाहेब पाटील यांना ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय?असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण, हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
000