Month: November 2024

ठाण्यातील पदपथ फेरीवाल्यांना आंदण

 सायंकाळच्या वेळी पदपथावरून चालणे अवघड   ठाणे : शहर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे. रेल्वेस्थानका बाहेरील परिसरात सायंकाळच्यावेळी पदपथांवर फेरीवाल्यांचा बाजार भरत आहे. पदपथावर विक्री साहित्यासह ठाण मांडून बसलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे पदपथ अडविला जात आहे. हे फेरीवाले रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी विक्री करतात. या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नसून नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. तर, फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखोच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. या स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली सकाळच्या वेळेत फेरीवाले फारसे दिसून येत नाहीत. परंतू, सायंकाळ होताच या ठिकाणी फेरीवाले येण्यास सुरुवात होते. सायंकाळी घरी परतणारे अनेक नागरिक निवांत असतात, त्यामुळे ते काही तरी खरेदी करतील या उद्देशाने फेरीवाले वेगवेगळे साहित्य विक्रीसाठी घेऊन याठिकाणी बसलेले पाहायला मिळतात. खरंतर हा बाजार सायंकाळच्या वेळी कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरु लागला आहे. स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली, गावदेवी परिसर, नौपाडा, नितीन कंपनी तसेच स्थानक परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरातही फेरीवाले पदपथ आणि रस्ते अडवीत असल्याचे दिसत आहे. या मार्गावरुन येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना या फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाचे या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांना आंदण दिले आहेत का असा सवाल काही नागरिकांकडून विचारला जात आहे. तर, फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई केली जात असून स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नागरिक प्रतिक्रिया मी दररोज गावदेवी परिसरातून लोकमान्य नगरला जाण्यासाठी रिक्षा पकडतो. अनेकदा सायंकाळच्यावेळी याठिकाणी जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध नसतात. त्यामुळे रिक्षा येईपर्यंत थांबावे लागते. या रिक्षा थांब्याला लागूनच पदपथ असूनही फेरीवाल्यांमुळे रस्तावरच उभे राहावे लागत आहे अशी प्रतिक्रिया राज चव्हाण यांनी दिली. महापालिका प्रतिक्रिया स्थानक परिसर ते गावदेवी मंदिरापर्यंतचा सर्व परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. फेरीवाल्यांसदर्भात नुकतीच आमची बैठक झाली. स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी आम्ही पूर्णपणे बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी पथक नेमण्यात आले असून हे पथक दोन सत्रात काम करणार आहे. त्यामुळे सॅटीस पुलाखाली, पादचारी पुल, स्थानक परिसर, गावदेवी परिसर या ठिकाणी येत्या दिवसात एकही फेरीवाला दिसणार नाही. स्थानक परिसर ते गावदेवी मंदिर या १५० मीटर च्या क्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. तरी, या क्षेत्रात फेरीवाले दिसले तर, ताटकळ त्यांच्यावर कारवाई केली जाते. १५० मीटरच्या पुढील जे क्षेत्र आहे तसेच इतर परिसरातही अतिक्रमण विभागाची कर्मचारी नेमण्यात आली आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई नियमित सुरु आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी  बोलताना दिली.

उपचाराअभावी गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू

हाणूमधील घटनेने खळबळ कासा : डहाणू तालुक्यातील एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंकी डोंगरकर ( २६) असे या गर्भवती…

लाडक्या बहिणी, सुना,लेकीवर बाबासाहेबांचे उपकार आहेत-राहुल हंडोरे

कल्याण : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल लिहून महिलांना सामानतेचा अधिकार देऊन संविधानात तशी तरतूद करून समस्त महिला वर्गावर, लाडक्या बहिणीवर, लाडक्या सुना लेकीवर उपकार…

 शौचालय उद्घाटनाने साजरा झाला जागतिक शौचालय दिन

 घोलाईनगरमध्ये १०० शौचालयांचे लक्ष्य पूर्ण, ठामपा आणि शेल्टर असोसिएट्स यांचा संयुक्त उपक्रम   अनिल ठाणेकर अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊन स्वच्छतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देशाने ठाणे महापालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एक घर एक शौचालय’ हा प्रकल्प राबवला जात आहे. घोलाई नगर, कळवा येथे या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन करून जागतिक शौचालय दिन (१९ नोव्हेंबर) साजरा करण्यात आला. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनात कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या घोलाई नगर या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या प्रकलपाची अमलबजावणी सुरू होती. या प्रकल्पांतर्गत लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी संस्थेमार्फत मोफत शौचालय साहित्य पुरवले जाते. या प्रकल्पात १०० शौचालये बांधून पूर्ण झाली. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने घोलाईनगर येथे छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. त्यानिमित्ताने, सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यासह स्वच्छतेशी निगडित खेळही घेण्यात आले. त्यावेळी, कळवा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया यांच्यासह शेल्टर संस्थेचे वैभव काळे, ज्ञानेश्वर आडे, योगिता शिंदे, पूजा भालेराव, कोमल इंगळे, समीक्षा राबाडे आदी उपस्थित होते. 0000

बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर दोघांनाही ९०, ९३५ एवढीच मते – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर बाळासाहेब पाटील यांना  ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय?असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना  ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण,  हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 000

 ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ फत्ते!

 रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर…

अराजकतेच्या उंबरठ्यावर पाक

  पाकिस्तानात पुन्हा एकदा अराजक निर्माण झाले आहे. गो‍ळीबारात अनेक कार्यकर्ते ठार झाल्याने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय)ने चार दिवसानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले, तरी…

सकळाशी येथे आहे अधिकार

भारतीय संविधानाच्या अनुछेद 19 ते 28 पर्यंत विविध प्रकारचे स्वातंत्र्य भारतीयांना नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील पाहिलेच आणि अतिमहत्वाचे स्वातंत्र्य संविधानामध्ये नमूद करण्यात आले ते म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती…

हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री

झारखंड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांचीमधील मोरहाबादी मैदानात झालेल्या या शपथविधीला इंडिया आघाडीचे बडे नेतेही उपस्थित होते. यावेळी राज्यपाल संतोष गंगवार…