ठाणे : देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण संस्था, ठाणे यांचे कार्यालय आता सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळात संस्थेच्या सर्व सभासदांसाठी दररोज सुरु झाले आहे. कार्यालयात टीव्ही, इंटरनेट, कॅरम बोर्ड, बुद्धिबळपट यांचीही सोय करण्यात आलेली आहे.
दैनिक वृत्तपत्रे, करावोके देखील कार्यालयात नजिकच्या काळात ठेवण्यात येणार आहेत. ठाणे परिसरातील सर्व देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण मंडळींनी संस्थेत येवून आपपसात चर्चा, गप्पागोष्टी कराव्यात. विरंगुळ्याचे एक उत्तम साधन म्हणून आपल्या जागेचा उपयोग करून घ्यावा. लवकरच महिलांसाठी योग वर्ग व सामुहिक भजन देखील सुरु करण्याचा आपला मनोदय असल्याचे संस्थेचे सचिव श्री. प्रसाद ठकार आणि मार्गदर्शक व उपाध्यक्ष श्री. चद्रंशेखर उर्फ अप्पा महाशब्दे यांनी सांगितले आहे. संस्थेचा पत्ता – ६०२, श्री स्वामी समर्थ को.ऑप. सोसायटी, ६वा मजला, (लिफ्टची सोय आहे) प्रशांत नगर, ताराबाग सोसायटी समोर, नौपाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला, नौपाडा, ठाणे – ४००६०२. संस्था आपल्या ज्ञाती बांधवांसाठी व त्यांच्या सहकार्यानेच यापुढील वाटचाल करणार असल्यामुळे दररोज सकाळी ११ ते २ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत सर्व देशस्थ ॠग्वेदी बांधवांनी व भगिनिंनी संस्थेस अवश्य भेट द्यावी अशी विनंती अध्यक्ष श्री. विलास जोशी यांनी केली आहे. संपर्कासाठी मोबाईल – कारेकर ९७०२८४६३८६, प्रसाद ठकार – ९९२०६६६७९६
०००००
