चिन्मय केवलरमानी, प्रणिता सोमन महाराष्ट्र संघाचे कर्णधार

 

पुणे, दि. ५ डिसेंबर – पुरी, ओडिसा येथे ७ ते १0 डिसेंबर २०२४ दरम्यान २९वी सिनीअर, ज्युनिअर आणि सब ज्युनीअर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या महराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी पुरुषांमध्ये पुण्याचा राष्ट्रीय पदक विजेता सायकलपट्टू चिन्मय केवलरमानी आणि महिलांमध्ये अहिल्यानगरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती सायकलपट्टू प्रणिता सोमन यांची निवड करण्यात आली आहे.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच सुदाम रोकडे यांच्या अध्यक्षतेखालील सी एफ आय चे उपाध्यक्ष प्रताप जाधव, कॅमचे सचिव प्रा. संजय साठे, धरमेंदर लांबा आणि शिवछत्रपती पारितोषिक सन्मानित मीनाक्षी चौधरी – शिंदे यांच्या समितीने महाराष्ट्राचा २३ पुरुष १९ महिला असा एकूण ४२ सायकलपट्टूंचा संघ निवडला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीमती दिपाली पाटील यांनी निमंत्रक म्हणून काम पाहिले.
महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे:
पुरुष: मेन ईलीट: चिन्मय केवलरमानी (कर्णधार), सूर्या थात्तू सुदर्शन देवर्डेकर, श्रीकांत खडतरे (सर्व पुणे), सिध्देश पाटील (कोल्हापूर), यश थोरात (मुंबई),  महिला – वुमेन ईलीट: प्रणिता सोमन (कर्णधार), अपूर्वा गोरे (दोघी  अहिल्यानगर), ऋतिका गायकवाड (नासिक),मनाली रत्नोजी (पुणे), योगेश्वरी कदम (सांगली), पुरुष: मेन अंडर २३ –  मुस्तफा पत्रावाला, विवान सप्रु (दोघे मुंबई), वीरेंद्रसिंह पाटील (क्रीडा प्रबोधिनी पुणे),  अमन तांबोळी (सांगली) ज्युनिअर बॉईज: निहाल नदाफ (सांगली),  विपलव  मालपुते (पुणे), समर्जित थोरबोले, हरीश डोंबाळे (दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे), वुमेन ज्युनिअर: जुई नारकर (मुंबई) ,आकांक्षा म्हेत्रे (जळगाव) स्नेहल माळी (रायगड), सिद्धी शिर्के(पुणे), आसावरी राजमाने (क्रीडा प्रबोधिनी पुणे), बॉईज सब ज्युनिअर: मोक्ष सोनवणे(नासिक), राज कारंडे (अहिल्यानगर),  ओंकार गांधले, श्रीनिवास जाधव (दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे), गर्ल्स सब ज्युनिअर: श्रावणी परीट (पुणे), निम शुक्ला (मुंबई),आभा सोमन (पुणे), प्राजक्ता सूर्यवंशी (सांगली), युथ बॉईज दानिश जमादार, संस्कार घोरपडे (दोघे सांगली), अर्नव गौंड, अनुज गौंड (दोघे पुणे), युथ गर्ल्स् : गायत्री तांबवेकर (पुणे), राजनंदिनी सोमवंशी (क्रीडा प्रबोधिनी पुणे), अर्णवी सावंत (कोरेगोव-सातारा), प्रचिती खताळ (पुणे) महिला प्रशिक्षक / व्यवस्थापक: श्रीमती  दिपाली शिलदणकर प्रक्षिक: दर्शन बारगुजे व्यवस्थापक / मेकॅनिक :स्वप्निल माने
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *