ओम साईश्वर विरुध्द श्री समर्थ व सरस्वती अंतिम फेरीत लढणार
मुंबई, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई येथे सुरु आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात किशोरींमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळ व श्री समर्थ व्यायाम मंदिर तर किशोरांमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळ व सरस्वती मंदिर हायस्कूल यांनी अंतिम फेरीत धडक मारली.
किशोरींच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने शिवनेरी सेवा मंडळाचा (९-३-३) ९-६ असा १ डाव ३ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे कादंबरी तेरवणकरने ३:००, ३:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. आर्या जाधवने १:५०, २:०० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. आर्या गोरीवले व आर्या आचरेकरने आक्रमणात प्रत्येकी २ खेळाडू बाद केले. शिवनेरी तर्फे गार्गी काडगेने १ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. त्रिशा गुप्ताने १:५० मिनिटे संरक्षण केले.
किशोरींच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने सरस्वती मंदिर हायस्कूलचा (९-२-२) ९-४ असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. श्री समर्थतर्फे सोनम शेलारने नाबाद ३:१०, नाबाद ३:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. आस्था महाडिकने १:४०, १:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. खुशी यादवने २:१० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. सरस्वतीतर्फे वैदवी बटावलेने १:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. राधिका कोंडुस्करने २:१० मिनिटे संरक्षण केले.
किशोरांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबचा (११-२-२) ११-४ असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वर तर्फे अदिराज गुरवणे नाबाद ३:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. यशराज गुजरने ३:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. आरव साठमने २:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. वैभवतर्फे यश जाधवने नाबाद २:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. सिद्धांश सावंतने १:४० मिनिटे संरक्षण केले.
किशोरांच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा (४-७-१०-१) १४-८ असा ६ गुणांनी पराभव केला. सरस्वतीतर्फे वरुण गुप्ताने ४ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. महेक अडवडेने २:००, नाबाद ३:०० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. प्रथमेश तर्पेने आक्रमणात ३ गडी बाद केले. विद्यार्थीतर्फे पियुष मानेने १:४०, १:१० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ५ गडी बाद केले. विघ्नेश जाधवने २:५० मिनिटे संरक्षण केले.
आज किशोरी गटाचा अंतिम सामना ओम साईश्वर सेवा मंडळ विरुद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिर यांच्या मध्ये रंगणार आहे किशोर गटाचा अंतिम सामना ओम साईश्वर सेवा मंडळ विरुद्ध सरस्वती मंदिर हायस्कूल मध्ये रंगणार आहे.