छञपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या
सोयगाव : येथील छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व क्रीडा भारती छ्त्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवस रात्र ५५ वजनी गटाच्या ५ तसेच ५७ वजनी गटाच्या २ कब्बडी स्पर्धांचे शानदार शानदार उद्घाटन शनिवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आले.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विलास हरपाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने सोयगाव येथे मंडळातर्फे क्रीडा भारतीच्या सहकार्याने ता.२१ डिसेंबर (शनिवारी) ५५ वजनी गटाच्या ५ तसेच ५७ वजनी गटाच्या कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी मंडळा तर्फे प्रथम बक्षीस २१०००/- रूपये,द्वितीय बक्षीस ११०००/- रूपये,तृतीय बक्षीस ७०००/- रूपये तसेच कृष्णा चौधरी यांच्या स्मरणार्थ चतुर्थ बक्षीस ५०००/- रूपये देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ठ चढाई,पकड, ऑल राऊंडर व मेंन ऑफ द सिरीज यांच्यासाठी स्वंतत्र बक्षिसे राहणार आहे.
शनिवारी सायंकाळी सात वाजता समाजसेवक संजय शहापूरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रथम शो मॅच शिवाजी क्रीडा मंडळ व भैरवनाथ क्रीडा मंडळ यांच्या घेण्यात आला.यावेळी शांताराम देसाई,माजी खेळाडू आबा पवार ,गोविंदा सोनवणे,युवराज हजारी,रघुनाथ फुसे,भरत पगारे, तसेच पोलिस स्टेशनचे अधिकारी रवींद्र तायडे,दांडगे ,कमलेश काळे,ज्ञानेश्वर वाडेकर,भूषण पवार ,दीपक बनकर,दत्तू काटोले,जुमनाके,चौधरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होते.या स्पर्धेसाठी मुबई,संभाजीनगर,जळगाव,बुलढाणा आदी जिल्ह्यातून कबड्डी संघ सहभागी होण्यासाठी आलेले आहे.