वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

ठाणे : छत्रपती शिक्षण मंडळाचे मो. कृ. नाखवा हायस्कूल व जिजाई बाल मंदिर प्राथमिक व पूर्व प्राथमिक  ठाणे या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार 20 व  21डिसेंबर रोजी  संपन्न झाला . स्नेहसंमेलन 20 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून जगन्नाथ केदारे ,परीक्षक म्हणून प्रतिभा घाडगे व सुरेश रासकर शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते .
21डिसेंबर 2024 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे डॉ. अभिषेक राणे (स्त्रीरोग तज्ञ, समाजसेवक), शालेय समिती अध्यक्ष संजय पालकर. माजी विद्यार्थिनी प्रतिभा घाडगे यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. अभिषेक राणे यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी आदर व्यक्त केला. शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिले. संजय पालकर सरांनी मोबाईल पासून दूर रहा,आपले सुप्तगुण ओळखून यशस्वी वाटचाल करा असे उद्बोधक गोष्टी,उदाहरणातून सांगितले..सर्व शिक्षक विद्यार्थी कौतुक केले. .सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.विशेष म्हणजे पालकांसाठीही विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. कला  दालनाचे उद्घाटन माननीय संजय पालकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. बबन निकुम, ऋतुजा गवस, सुखदा वैद्य  मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाने, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न  झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *