रमेश औताडे
मुंबई :आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वं. यंशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या पावन भूमीत २१ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी आणि सत्कारमुर्ती म्हणून डाँ.निळकंठ धारेश्वर महाराज तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांच्याहस्ते पत्रकार भीमराव धुळप यांना सन्मानित करण्यात आले.
धुळप यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्याची स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट परिवाराने दखल घेऊन निवड केली होती. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डाँ.संदिप डाकवे, पत्रकार, कवी गजानन तुपे, पार्श्वगायिका कविता राम,निर्माते विठ्ठल डाकवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भीमराव धुळप यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून ते धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक तसेच डीडी न्यूज चे संपादक आहेत. गेली अनेक वर्ष ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत अग्रेसर असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना ते वैद्यकी