उल्हासनगर : : गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या प्रलंबित मागण्या होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
10,20,30 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना सेवा लाभ दयावा, अनुकंम्पा तत्वावर असलेल्या कामगारांना न्याय दयावा, सर्वच संर्वगाच्या पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती बाबत त्वरित निर्णय घेणे, नियमबाह्य कारभार सोपवण्यात आलेल्या अधिकारी वर्गाबाबत खुलासा करणे, सफाई कामगार यांना मोफत घरे नावावर करणे, कत्राटी कामगारांची पगारवाढ करणे आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच 30 डिसेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही तर खळ खट्याक करण्यात येणार असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात अध्यक्ष दिलीप थोरात यांच्यासह सचिन साठे, अनिल देवकर, रमेश वाघेला, राजेश मकवान, हरेष बेहनवाल, अजय गायकवाड, समाधान निकम, नितू बोरकर, प्रमिला खाबायतकर, शांताराम शेळके आदी सहभागी झाले होते.
