– सागरी कामगारांना सुरक्षितपणे परत आणणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब – मिलिंद कांदळगावकर
अनिल ठाणेकर
ठाणे : यमनजवळ यंदा झालेल्या एका भीषण घटनेनंतर एसा स्टार जहाजावरील सर्व भारतीय सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत.आपल्या सागरी कामगारांना सुरक्षितपणे परत आणणे ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे, असे नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (नूसी)चे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
५ डिसेंबर २०२४ रोजी या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता, ज्यामुळे रेड सी प्रदेशातील तणाव वाढल्याचे दिसून आले. सागरी कामगारांना यशस्वीरीत्या सुरक्षितपणे आणल्याचे श्रेय नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (नूसी) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार महासंघ (आयटीएफ) यांच्या नेतृत्वाखालील धाडसी व्यवस्थापकीय प्रयत्नांना जाते. या संस्थांनी सागरी कामगारांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम केले. आपल्या सागरी कामगारांना सुरक्षितपणे परत आणले, ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे,” असे नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय समुद्री सहकार्याच्या प्रभावीपणे केलेल्या कार्याचे हे यशस्वी उदाहरण आहे. यमन किनाऱ्याजवळील जहाज वाहतुकीच्या मार्गांवर वाढत्या हल्ल्यांपैकी एसा स्टारवरील हा एक भीषण हल्ला होता. या घटनेमुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसंबंधीचा धोका निर्माण झाला आहे..मुंबईच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर परतणाऱ्या सागरी कामगारांचे त्यांच्या कुटुंबियांनी भावनिक स्वागत केले. त्याठिकाणी वैद्यकीय पथक तत्पर होते, परंतु प्राथमिक अहवालांनुसार सर्व कामगारांची प्रकृती चांगली असून ते सुरक्षित आहेत. सागरी कामगार संघटनां आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सागरी कामगारांना मुंबईत सुरक्षितपणे परत आणून कामगारांच्या हक्कांचे व सुरक्षिततेचे रक्षण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच, संकटग्रस्त समुद्री मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सावधगिरी व आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे. किनाऱ्यावर सुरक्षित आलेल्या सागरी कामगारांच्या कुटुंबियांनी परत आणण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आभार मानले.आमच्या प्रिय व्यक्तींना सुरक्षितपणे घरी परत आणले. हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे, असे एका कुटुंबीयाने सांगितले. या कठीण काळात नुसी व आयटीएफ कडून मिळालेला पाठिंबा अनमोल होता.या घटनेनंतर, विशेषत: समुद्री संघर्षग्रस्त भागांमध्ये सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी पुन्हा एकदा सुरक्षेची मागणी वाढली आहे. व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी समुद्री प्राधिकरणे सद्यपरिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती मिलिंद कांदळगावकर यांनी दिली.
