भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबासह पोलिसांची घेतली भेट

 

कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ, आमदार सुलभा गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये भेट दिली. या आधी त्यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देत कुटुंबियांची विचारपूस करत सांत्वन केले. तसेच आसपासच्या नागरिकांशी देखील संवाद साधला. कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडून या प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली. तसेच या गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून या नराधमाला फाशीच होणार यासाठी पाठपुरावा करणार आहोत. पक्ष म्हणून नाही तर माणूसकी म्हणून सोबत आहोत. अशा नाराधमांचा चौरंगा करायला हवा. असे विकृत लांडगे समाजात फिरत आहेत त्यांना ठेचायची जवाबदारी आपली आहे. आरोपीला मदत करणाऱ्या बायकोला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशी विकृती मोडीत काढल्या शिवाय गप्प बसणार नाही. याआधीच्या गुन्ह्यात आरोपीने मनोरुग्णाचे सर्टिफिकेट सादर केल्याने तो सुटला होता मात्र आता तो यातून सुटणार नसून त्याला फाशीच होणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
एक आई म्हणून आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचे हाल हाल करू मात्र संविधानाच्या चौकडीत त्याला फाशीच होणार असल्याचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने आता गुन्हेगारांचे दिवस भरले आहेत. बहिणींच्या आणि त्यांच्या मुलींच्या सरंक्षणात सरकार कुठेही कमी पडणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *