कला-क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्राचा महोत्सव झाला अवघा पार्लेमय
मुंबई : रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखालील पार्ले महोत्सव २०२४ ने स्पर्धकांचा उच्चांक गाठला असून मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास ६० हजार स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असून प्रत्येकजण विजेतेपदासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे. या महोत्सवामुळे अवघी इथली डॉ. स्नेहलता देशमुख क्रिडानगरी पार्लेमय झालेली दिसून येत आहे.
सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती हा महोत्सव यशस्वी करत आहे. त्याचबरोबर त्याची व्याप्ती देखील वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याच्यापेक्षा अधिक भव्य आणि व्यापक नियोजन करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धक हा आपल्या क्षेत्रात इतका निपुण आहे की, नक्कीच तो भविष्यात राज्य आणि देशाचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास असल्याचे पराग अळवणी यांनी सांगितले.
महोत्सवाच्या सलग सातव्या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या असून अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आहे. मल्लखांब स्पर्धकांनी हा दिवस गाजवला असून समर्थ राणे याने पुरुष गटात तर श्रृती उतेकर हिने महिला गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची अनुक्रमे नावे – वैयक्तिक गट – पुरुष – समर्थ राणे, आदित्य पाटील, मृगंक पाठारे, निरंजन अमृते, अवधूत पिंगळे. महिला – श्रृती उतेकर, पूर्वा आंबोडकर, काव्यशी मसुरकर, खुशी पुजारी, तनश्री जाधव, पलक चुरी. सांघिक गट – पुरुष – पार्लेश्वर व्यायामशाळा, टीसुकाहार स्पोर्ट्स अकॅडमी, दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन. महिला – समता क्रिडा भवन, पार्लेश्वर व्यायामशाळा, गोरेगाव जिमखाना.
कॅरम स्पर्धेतील विजेत्यांची यादी अशी – खुला गट – मंगेश पंडित विजेता तर असिफ शेख उपविजेता. शालेय गट, मुले – पुष्कर गोळे विजेता तर प्रसन्ना गोळे उपविजेता, महिला गट – समृद्धी घाडीगावकर विजेती तर प्राजक्ता नारायणकर उपविजेती.
कराओके संगीत स्पर्धा – पहिले तीन विजेते – पुरुष गट – मानस भागवत, सुहास कुलकर्णी, प्रियदर्शन गोंधळेकर, महिला गट – अष्टा हळदणकर, गौरी मिश्रा, सरिता पांचाळ, जोडी – प्रथम – अनिल कुलकर्णी व कृपा पै, द्वितीय – मानस भागवत व स्नेहा बेडेकर. सोजी मॅथ्यू यांना उत्तम गायकाचे पारितोषिक मिळाले.
०००००
