स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळेचा
वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्हासात साजरा
हरिभाऊ लाखे
नाशिक : स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा इंदिरानगर नाशिक येथे २७ डिसेंबरला वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे प्राचार्य विलासकुमार देशमुख यांच्यासह माजी विद्यार्थिनी बागेश्री मानसी मनोज पारनेरकर, वृंदा जोशी, प्ररेणा कुलकर्णी, जयसिंह पवार, माधुरी देशपांडे, रत्नाकर वेळीस, राम बडोदे, दिपाली साळवे, आशा नागरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्हासात साजरा झाला.
यावेळी प्रमुख पाहूण्याची आपले मनोगत व्यक्त केले, व तसेच प्रमुख पाहूण्याचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला शासनदार व रंगतदार करण्यासाठी शिक्षक, शिक्षकांनी फार परिश्रम घेतले होते.
अंगणवाडी ते १०वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात यशस्वीरित्या भाग घेतले होते. यामध्ये विशेष कौतुक करावे असे डान्स, भाषणे, सुत्रसंचालन अशा विविध प्रकारच्या सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकले. याप्रसंगी काही लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचे जीवनाचे काही प्रसंग सादर केले. त्याप्रसंगाने प्रेक्षक वर्गाला अगदी क्षमभरही लक्षहटवू नये असे वाटत होते. या चिमुकल्यांच्या नृत्याने आणि संगिताने गजबजलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरुच रहावा असे वाटू लागले. या लहानग्यांचे कौतुक करावे तेव्हडे कमीच. म्हणतात ना तर खरा शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्याच्या आव्हानांसाठी सज्ज करतो. हा कार्यक्रम पाहताना याची चांगली प्रचिती सर्व प्रेक्षकांना आली, अगदी अंगणवाडीच्या मुलांनी नृत्यासोबत आपल्या सादरीकरणातून खुप चांगले दर्शन घडवून दिले आहे. यामध्ये विशेष म्हणजे आजच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ‘जंक फुड’ याचे आपल्या मानवी जीवनावर होणारे परिणाम याचे उत्तम उदाहरण यांनी आपल्या कलाविष्कारात दाखवले, अशा अन्य गोष्टींचा सर्व समावेशक हा कार्यक्रम मोठ्या उत्हासात साजरा झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या माता-पितांनीही भरभरुन प्रतिसाद दिला, यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष मा.वृंदा जोशी उपाध्यक्ष मा. प्रेरणा कुलकर्णी सचिव जयसिंग पवार, शालेय समितीचे अध्यक्ष माधुरी देशपांडे, मुख्याध्यापक रत्नाकर वेळीस सर शिक्षक समिधा पाठक, तृप्ती पारखी, ज्योती वणीस, स्नेहा शुक्ल, रविता मॅडम, भावना नाईक, मानसी मॅडम ,वैष्णवी पांडे ,वर्षा चौधरी ,प्रीती मॅडम वैशाली गांगुर्डे, पगार सर, योगेश पाटील, गोसावी सर, दीपक भोये सर, शितल गावित, योगेश कड इत्यादी शिक्षक-श्िाक्षिकांच्या अथांग परिश्रमाने हा कार्यक्रम पार पाडला.





