ठाणे : येथील बाळकूम भागात डेब्रीज टाकल्यामुळे हेक्टभर खारफुटी नष्ट झाली.याप्रकरणी म्युझ फाऊंडेशनने महाराष्ट्र वन विभागाच्या खारफुटी विभागाकडे तक्रार नोंदावली होती. या तक्रारीच्या आधारे ठाणे महसूल विभागाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाळकूम – कोलशेत परिसरात डेब्रीज टाकून जमीन समतल करण्याचे काम गेले अनेक वर्षांपासून सुरु होते. याची माहिती पर्यावरणप्रेमींनी म्युझ फाऊंडेशन या संस्थेला दिली. या संस्थेच्या सदस्यांनी डेब्रीज घेऊन येणाऱ्या ट्रक हालचालींचे दस्तऐवजीकरण केले. एप्रिल २०२१ मध्ये, ठाणे महापालिकेने खारफुटी शेजारील रस्त्यावर मोठे ट्रक जाण्यापासून रोखण्यासाठी उंचावरील अडथळे बांधले होते. परंतू, त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी हे अडथळे काढून टाकले होते.
यासंदर्भात, महाराष्ट्र वन विभागाच्या खारफुटी विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर म्युझ फाउंडेशनने वन विभागाच्या खारफुटी विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर, ठाणे महसूल विभागाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तात्काळ तपास पूर्ण करून जमिनीच्या मालकांना अटक करावी, अशी मागणी म्युझ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. तर, खारफुटी विभागाने तात्काळ डेब्रीज काढून तेथील क्षेत्र पूर्ववत करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *