६६वी टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धा
मुंबई : कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या लढतीत सुपर ओव्हरपर्यंत लांबलेल्या सामन्यात स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुपने प्रभू जॉली यंग क्रिकेटर्स संघावर सरशी मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अन्य लढतीमध्ये गतविजेते ठाण्याचा युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन, अणुशक्तीनगर स्पोर्ट्स क्लब आणि स्पोर्ट्स फिल्ड संघानी उपांत्य फेरीत जागा मिळवली.
स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुपने प्रथम फलंदाजी करत १८ षटकात ४ बाद १२० धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना प्रभू जॉली यंग क्रिकेटर्स संघानेही १८ षटकात ९ बाद १२० धावा करत बरोबरी साधली. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये प्रभू जॉली यांग क्रिकेटर्स संघाने ५ चेंडूत २ बाद १ धाव बनवली . त्यानंतर स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुपने ५ चेंडूत एका फलंदाजाच्या मोबदल्यात एका धावेसह विजय निश्चित केला.
संक्षिप्त धावफलक : स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप : १८ षटकात ४ बाद १२० (जयंत डिंगोरे ३०) विरुद्ध पराभू जॉली यंग क्रिकेटर्स : १८ षटकात ९ बाद १२० . सुपर ओव्हर : प्रभू जॉली यंग क्रिकेटर्स : ५ चेंडूत २ बाद १ पराभूत विरुद्ध स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप : ५ चेंडूत १ बाद १. सामनावीर : आयुष सिंग.
यंग स्टार : २० षटकात ८ बाद ९५. पराभूत विरुद्ध युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन : १८,४ षटकात ५ बाद ९६. सामनावीर : एस श्रॉफ.
00000