Month: December 2024

सौर उर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरीव कामगिरी

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयासाठी एकूण…

 ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडा व वीजबिलात एकरकमी 120 रुपये सूट मिळवा

 नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट मुंबई : नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी  120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने  केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे. ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडणाऱ् या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे 120 रुपये  एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे.  ग्राहकांनी या योजनेचा लाभ  घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा. 000000

पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध – सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे :महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, चिनी मांजा तथा सिंथेटिक-नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. त्यासाठी,  प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजांच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र, या तपासणीत एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारिक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मल प्रणाली, जलनि:सारण बाधित होते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते. तसेच, हा धागा विद्युत वाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे..या तपासणी दरम्यान, एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यानी दिली.प्रतिबंधित सिंथेटिक, नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल. 0000

५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे-  रोहन घुगे

ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुढ व्हावा व सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २ जानेवारी…

सानपाड्यामध्ये आगरी कोळी समाजाला दिशा देणारा एक दिवसीय मोफत लग्न सोहळा संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबईमधील ठाणे बेलापूर पट्टीतील सानपाडा येथील आगरी कोळी समाजातील लग्न सोहळ्यात होणारा खर्च टाळण्यासाठी  सानपाडा येथील ग्रामस्थांनी समाजात जागृती व्हावी म्हणून एक दिवशीय लग्न सोहळा करण्याचे आवाहन…

नाशिक महापालिकेची ऐतिहासिक वसुली

मालमत्ता कर संकलनात २०० कोटींचा टप्पा पार   नाशिक : महापालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आजवरच्या इतिहासात नऊ महिन्यांत इतकी वसुली कधीही झालेली नाही. थकीत घरपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेतून ५० कोटींची वसुली झाली. कर संकलन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरीस मालमत्ता कर वसुलीत नऊ महिन्यात पहिल्यांदा २०२ कोटींचा गप्पा गाठला गेला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २५० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे लक्ष्य तेवढेच होते. तेव्हा डिसेंबरअखेरपर्यंत १५२ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र आजवरचे सर्व विक्रम मोडून काढत वसुलीत लक्षणीय यश मिळाले. शहरातील सहा विभागात साडेपाच लाखहून अधिक मालमत्ता आहेत. मालमत्ता कराच्या २७२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मध्यंतरी अभय योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात थकबाकी एकरकमी भरणाऱ्यांना दंडातून ९५ टक्के माफी देण्यात आली. या योजनेतून ५० कोटींची वसुली झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एप्रिल ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी २०२ कोटींचे संकलन करण्यात आले. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत एकूण २०७ कोटींची वसुली झाली होती. गतवर्षी याच काळात संकलित झालेल्या रकमेच्या तुलनेत ही वसुली ५० कोटींनी अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कल संकलनाची आकडेवारी आणखी वाढणार आहे. 00000

 नाशिक महापालिकेची ऐतिहासिक वसुली

 मालमत्ता कर संकलनात २०० कोटींचा टप्पा पार   नाशिक : महापालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आजवरच्या इतिहासात नऊ महिन्यांत इतकी वसुली कधीही झालेली नाही. थकीत घरपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेतून ५० कोटींची वसुली झाली. कर संकलन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरीस मालमत्ता कर वसुलीत नऊ महिन्यात पहिल्यांदा २०२ कोटींचा गप्पा गाठला गेला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २५० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे लक्ष्य तेवढेच होते. तेव्हा डिसेंबरअखेरपर्यंत १५२ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र आजवरचे सर्व विक्रम मोडून काढत वसुलीत लक्षणीय यश मिळाले. शहरातील सहा विभागात साडेपाच लाखहून अधिक मालमत्ता आहेत. मालमत्ता कराच्या २७२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मध्यंतरी अभय योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात थकबाकी एकरकमी भरणाऱ्यांना दंडातून ९५ टक्के माफी देण्यात आली. या योजनेतून ५० कोटींची वसुली झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एप्रिल ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी २०२ कोटींचे संकलन करण्यात आले. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत एकूण २०७ कोटींची वसुली झाली होती. गतवर्षी याच काळात संकलित झालेल्या रकमेच्या तुलनेत ही वसुली ५० कोटींनी अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कल संकलनाची आकडेवारी आणखी वाढणार आहे. 00000

 मुंबई महानगरपालिकेचा अजब कारभार

करोनाबाधितांसाठी घेतलेले ईएसआयसीचे रुग्ण कक्ष तब्बल तीन वर्षांनी केले परत   मुंबई : मुंबई महानगरपालिकेने करोनाबाधातांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) कांदिवलीमधील रुग्णालयातील रुग्ण कक्ष ताब्यात घेतला होता. मात्र करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी मुंबई महानगरपालिकेने हा रुग्ण कक्ष ईएसआयसी रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिला नव्हता. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत होती. रुग्णालय प्रशासनाने रुग्ण कक्ष परत मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला तीन वर्षांनी यश आले असून, सात दिवसांत हा रुग्ण कक्ष रुग्णालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी २०२०-२१ दरम्यान ईएसआयसीच्या कांदिवली रुग्णालयातील रुग्ण कक्ष ताब्यात घेतला होता. या रुग्ण कक्षात ६३ खाटा आहेत. या रुग्ण कक्षांमध्ये अनेक रुग्णांवर उपचारही करण्यात आले. मात्र करोना संपुष्टात आल्यानंतर हा रुग्ण कक्ष व त्यातील ६३ खाटा पुन्हा ईएसआयसीच्या ताब्यात देणे अपेक्षित होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने बंद केलेल्या करोना केंद्रातील साहित्य या रुग्ण कक्षांमध्ये ठेवले. त्यामुळे ईएसआयसी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना या कक्षात दाखल करताना रुग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. जागेअभावी अनेक रुग्णांना दाखल करून घेण्यास प्रशासनाला नकार द्यावा लागत होता. त्यामुळे रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात होता. रुग्ण कक्ष परत मिळावा यासाठी रुग्णालय प्रशासनाने वारंवार मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच कांदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाने ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत तातडीने कार्यवाही करून हा रुग्ण कक्ष ईएसआयसी रुग्णालयाला हस्तांतरित करण्याच्या सूचना पीयूष गोयल यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. करोना महामारी संपली असून आपण आपल्या रुग्णालयाच्या नियमित रुग्ण कक्षाचा वापर करू शकता. रुग्ण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले साहित्य पुढील सात दिवसांत तातडीने हलविण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उप आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी केंद्रीय मंत्र्यांची सूचना मिळताच ईएसआयसी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पाठवले. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर कांदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयाला त्यांचा रुग्ण कक्ष परत मिळणार आहे. कोट दोन दिवसात मुंबई महानगरपालिका त्यांची साधनसामग्री घेऊन जाणार आहे. रुग्ण कक्ष ताब्यात आल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होणार आहे. डॉ. केतन छेडा, रुग्णालय प्रमुख, कांदिवली ईएसआयसी रुग्णालय कांदिवली ईएसआयसी रुग्णालयातील रूग्ण कक्षामध्ये ठेवलेले सामान हलविण्यात येईल. -संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका

सहभाग आणि सहकार्य हाच नैनाच्या यशस्वीतेचा मंत्र

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयनाची वेळ जवळ येत असताना, त्याच्या आसपासचे  नैना क्षेत्र, गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी आकर्षणाचे  केंद्र बनले आहे. या क्षेत्राच्या नियोजन आणि विकासाची जबाबदारी असलेल्या सिडकोने, विकास प्रक्रियेत जमीनमालकांशी…

माकपच्या छ.संभाजी महाराजनगर जिल्हा सचिवपदी भगवान भोजने यांची फेरनिवड

अनिल ठाणेकर ठाणे : २९  डिसेंबरला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष छत्रपती संभाजी महाराजनगरचे १३ वे जिल्हा अधिवेशन गांधी भवन जवळील मैदानात पार पडले या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी भगवान भोजने यांचे जिल्हा सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. या अधिवेशनाचे उद्घाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य सुनील मालुसरे यांनी केले. यावेळी जेष्ठ कामगार नेते डॉक्टर कॉम्रेड डी .एल. कराड व कॉ. किसन गुजर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी मागील तीन वर्षाच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला यावर आलेल्या प्रतिनिधींनी चर्चा केली त्यानंतर महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामधे, २०२० चे शिक्षणाचे बाजारीकरण करणारे शैक्षणिक धोरण रद्द करा, कामगारांना देशोधडीला लावणारी कामगार संहीता रद्द करा, राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पक्षाने योग्य हस्तक्षेप करून जनतेचा लढा उभारावा, शेतकी मलाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये पक्षाने व्यापक संघटन उभे करावे या विविध ठराव पारित करण्यात आले. विद्यार्थी युवक कामगार शेतकरी शेतमजूर महिला एकजुटीच्या आधारावर आगामी काळात पक्ष बांधणी करून सामान्य जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करावा असा निर्धार याबद्दल अधिवेशनात करण्यात आला. ०००००