नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई
नवी मुंबई: उच्च न्यायालयाचे वेळोवेळी आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत 1) श्री. श्रीमंत हजारे, एन.एल.-1 बी-16/15, से.10, नेरूळ, नवी मुंबई, 2) श्री. गंगाराम देशमुख, एन.एल.1 ए-6/4, से.10, नेरूळ, नवी मुंबई, यांचे सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता अंदाजे 3.50मी X 7.20मी मोजमापाचे G+4 आर. सी. सी. बांधकाम अनधिकृतरित्या करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अनधिकृत बांधकामधारकाला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नेरुळ विभाग कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये दि.10/12/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. तथापि, नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही.
सदर कारवाई सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. जयंत जावडेकर व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, 10 मजूर, 2 गॅस कटर, 6 ब्रेकर च्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे. यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.