ठाणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी अभिवादन केले. यावेळी पुराभिलेख संचालनालयाचे अभिलेखाधिकारी मनोज हिं. राजपूत, मीरा-भाईंदरच्या नायब तहसीलदार स्मिता गुरव, मुरबाडच्या नायब तहसीलदार सुषमा बांगर, पुराभिलेख संचालनालयाचे संशोधन सहाय्यक स्वप्निल गावडे, भरत गवळी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.