कल्याण : खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कातकरी पाडा वाडेघर या आदिवासी पाड्यावर खडकपाडा पो स्टे कडून भेट दिली. तेथील लहान मुलांना एकत्र करून त्यांना व त्यांच्या पालकांना साहाय्ययक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकले यांनी पोलीस रेझिंग डे बाबत माहिती दिली आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
आपल्यालाही सरकारी अधिकारी व्हायचे असेल आमच्यासारखे पोलीस व्हायचे असेल तर तुम्हाला शिक्षण घ्यावे लागेल व पालकांनाही मुलांना नेहमी शाळेत पाठवण्याबाबत सुचित करण्यात आले. त्याकरता कोणतीही मदत लागल्यास खडकपाडा पो स्टे शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्व लहान मुलांना खडकपाडा पो स्टे च्यावतीने खाऊचे बॉक्स वाटप करण्यात आले. पहिल्यांदा पोलीस आदिवासी वस्तीत येऊन खाऊचे वाटप केल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पालकांनीही आम्ही जास्तीत जास्त मुलांना शाळेत पाठऊ व त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
०००००
