ठाणे: महाराष्ट्र राज्यगीत वाजवून मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून अग्निसुरक्षा जागरूकता व “मॉक ड्रील २०२५ ” उपक्रमाची सुरवात झाली।
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ठाणे बदलतंय’ संकल्पनेतून शिवसेना गटनेते व मा. नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी ठाणे शहराच्या वतीने ठाणेकरांमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण होण्यासाठी लोकमान्य नगर शिक्षण मंडळ व बारटक्के फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने ठाण्यात शाळामध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी अग्निदूतांचे आगप्रतिबंधक “मॉक ड्रील २०२५ ” हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक ठाणे जिल्हा ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष विजय यादव यांनी केले या वेळी गिरीश झळके मुख्य अग्निशमन अधिकारी ठाणे महानगर पालिका, अरविंद मांडके अग्निशमन सल्लागार जेएनपीटी, यासीन तडवी, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, मंगेश रामचंद्र ठाकूर उपाध्यक्ष लोकमान्य नगर शिक्षण मंडळ,प्राचार्य नरेंद्र मोरे रा.ज. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय, रुपेश चाफेकर आदि उपस्थित होते,
गिरीश झळके मुख्य अग्निशमन अधिकारी ठाणे महानगर पालिका यांच्या अग्निशमन टिमच्या मार्गदर्शना खाली भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर व रा .ज. ठाकूर ज्युनियर कॉलेज स्वा. सावरकर नगर ठाणे या शैक्षणिक,आस्थापनांमध्ये शुक्रवार ३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ ते २ शाळेच्या सभागृहात अग्निसुरक्षा जागरूकता मध्ये आगीची दुर्दैवी घटना घडू नये यासाठी आगप्रतिबंधक उपाययोजनाची अत्यावश्यकता, आपत्तीकालीन नियोजन, आगीच्या घटना कुठेही घडल्यास तर त्याला तोंड देण्यासाठी ठाणे महानगर पालिका अग्निशमन यंत्रणा कशी २४ तास सज्ज असते याची माहिती देण्यात आली तर दुपारी २ ते ३ या वेळेत मैदानात मॉक ड्रील करण्यात आले या उपक्रमात अग्निशमन, आग शोधणे,आग वेगळी करणे आदी प्रशिक्षण दिले यात २००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळांमध्ये अग्निशामक यंत्रणा या बद्दल विद्यार्थ्यांना शिक्षकांना मार्गदर्शन केले, ज्वालाग्राही पदार्थ अग्निशमन विषयीच्या सूचना, आगप्रतिबंधक व्यवस्थेविषयी माहिती देण्यात आली.
राजेंद्र पवार सहशिक्षक यांनी प्रास्ताविक केले तर स्वप्ना भानू सहशिक्षक यांनी सूत्रसंचालन केले या वेळी संगीता पाचपांडे श्रीमती वैशाली गायकवाड आदि शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *