ठाणे : फिट राहा हिट राहा म्हणत रविवारी पोलीस रेझिंग डे निमित्त सायकल राईड संपन्न झाली. या सायकल राईड मध्ये साडेचारशे हून अधिक सायकल प्रेमी सहभागी झाले होते. चार वर्षांच्या चिमुकली पासून ते ७२ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्व सायकल प्रेमींनी सहभाग घेत आरोग्याचा संदेश ठाणेकरांना दिला.
यंदाच्या सायकल राईडची थीम ही राईड फॉर हेल्थ अशी होती. नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतामणी चौक पासून सायकल राईट आयोजन करण्यात आले होते. अनुभवी सायकलिंग प्रेमी साठी लांब पडल्याची राईड आणि हौशी सायकल प्रेमींसाठी जॉईराईड अशा दोन प्रकारात संपन्न झाली. यावेळी वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त विजयसिंह भोसले, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, शिवसेना निवडणूक विभागाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विलास जोशी, आम्ही cycle प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार , गौरी मोरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने आदी व्यासपीठावर उपस्थित होते. फिट राहा हिट राहा सायकलिंग करत रहा असा संदेश देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन म्हणाले की, सध्याच्या काळात मैदानी खेळ राहिले नाहीत त्यामुळे शारीरिक व्यायाम करून तंदुरुस्त राहणे हे आताच्या काळात महत्त्वाचे आहे त्यामुळे सायकलिंग जॉगिंग वॉकिंग यांसारखे काही ना काही शारीरिक व्यायाम करत रहा. आपले आरोग्य सुदृढ ठेवा असे सांगितले. सहभागी सायकल प्रेमींना जर्सी आणि आकर्षक मेडल देण्यात आले. या राईडमध्ये चार वर्षीय जिज्ञासा कुंभार आणि ७० वर्षीय दुर्गा गोरे या सायकल प्रेमींनी विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे निवेदन अजय नाईक यांनी केले. या सायकल राईडचे नेतृत्व गणेश कोळी, गिरीश चिलकेवार, दिलीप तळेकर, गजानन दांगट, विनोद फर्डे, संकेत सोमणे, पंकज रिजवानी आदींनी केले. या सायकल राईड मध्ये ठाणे सह मुरबाड, खारघर, वसई विरार, पनवेल, कर्नाळा, कल्याण डोंबिवली यांसारख्या विविध भागातून आले होते.
