अनिल ठाणेकर
ठाणे : गेल्या पंधरवडय़ात ठामपाने ७६ कोटी थकीत बीलासह चालू वर्षांतील १४६ कोटी पाणी बिलासाठी सुमारे ३५०० नोटीस दिल्याचे वृत्त वाचण्यात आले. ठामपाने महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यांतर्गत पाणी विभागाचे बायलाॅज जाहीर करावेत, अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.
नियमित वीज बील ,पाणी बील,आयकर कर नियमित भरण्यार्यावर सरकार काहीच सवलती न देता कर चुकवण्यांवर शासन मेहरबान असते.ठामपाची स्थापना होऊन ४३ वर्ष पूर्ण झाली. आजपर्यंत ठामपाने थकीत पाणी बील वसुलीची राबवलेली ही पाचवी मोहीम असावी. जर पहिल्याच वेळी ही मोहीम अत्यंत कडक रीतीने राबवली असती तर योग्य झाले असते. जसजसे ठामपा मोठी होती तसतशी थकीत बील देण्यार्यांची संख्या वाढते कशी ? याचे उत्तर सदर विभागाला माहीती असणारच. यावर उत्तर एकच जे करदाते तीन वर्ष नियमित पाणी बील भरतील त्यांना तीन महिन्याचे पाणी बदलातून सूट दिल्यास प्रमाणिक करदात्यांच्या सन्मान होईल, अशी अपेक्षा धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.
000000