कल्याण : नुतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण (पूर्व) येथे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित “अविष्कार २०२४-२५ कल्पकतेकडून कृतीकडे” अंतर्गत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या प्रदर्शनात 6वी ते 9वी च्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर एकूण 61 प्रकल्प सादर केले.

प्रदर्शनाचे उद्घाटन चिंचपाडा जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक प्रतिभा गवळी व जरीमरी प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक भारती ओंकारेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रदर्शनाचे परीक्षण गणेश विद्या मंदिर सहाय्यक शिक्षक मिलिंद धंबा आणि जिल्हा परिषद शाळा, चिंचपाडा सहाय्यक शिक्षक योगिता मिसर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले आणि विज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला.

प्रदर्शनामध्ये औषधी वनस्पतींचे उपयोग, पुर्नप्रक्रियाआणि पुर्नवापर, भारतीय संशोधकांनी लावलेले शोध, अपारंपारिक ऊर्जा निर्मिती, संगीतमय विज्ञान प्रकल्प व सादरीकरण, वैद्यकीय शास्त्र यांसारख्या विविध विषयांवर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले या सर्व प्रकल्पांनी पालकांचे, परीक्षकांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या नव्या संधींची ओळख झाली आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *